Diwali 2021 | पाडव्याच्या सणाला 4 पिढ्या एकत्र, पवारांची ‘पॉवरफुल’ दिवाळी, सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर
संपूर्ण राज्यामध्ये सर्वत्र मोठ्या दिवाळी सण साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या परिवारामध्ये देखील दिवाळी साजरी केली गेली. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी एकत्रित साजरा केला दिवाळी पाडवा.
1 / 5
संपूर्ण राज्यामध्ये सर्वत्र मोठ्या दिवाळी सण साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या परिवारामध्ये देखील दिवाळी साजरी केली गेली. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी एकत्रित साजरा केला दिवाळी पाडवा.
2 / 5
शरद पवार यांना प्रतिभा पवार यांच्याकडून औक्षण केले गेले. यावेळी प्रतिभा पवार यांनी अंत्यत साध्या पद्धतीने दिवाळी पाडवा साजरा केलेला दिसत आहे. यावेळी प्रतिभा पवार यांनी हिरव्या रंगाची साधी पण सर्वांचे लक्षवेधून घेणारी साडी परिधान केली होती. ज्या ठिकाणी हा समारंभ पार पडला तिथे अतिशय सुंदर सजावट करण्यात आली होती. सुप्रिया सुळेंनी त्यांच्या सोशल मीडियावर हा फोटे शेअर केला आहे. त्या फोटो सोबत त्यांनी ?असे कॅप्शन दिले आहे.
3 / 5
गोविंदबाग, बारामती येथे संपन्न झालेल या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनेत्रा पवार यांनी देखील हजेरी लावली. अजित पवार यांना सुनेत्रा पवार यांनी औक्षण केले. सुप्रिया सुळेंनी त्यांच्या सोशल मीडियावर हा फोटे शेअर केला आहे.या फोटो सोबत जितदादा आणि सुनेत्रा वहिनी ही जोडी आमची अखंड उर्जा... वहिनी दादांचं औक्षण करीत असतानाचा हा क्षण... असे कॅप्शन दिले आहे.
4 / 5
तर सुप्रिया सुळें यांनी त्यांचे पती सदानंद सुळे यांचे औक्षण केले. या अमुल्य क्षणाचा व्हिडीओ सुप्रिया सुळेंनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ सोबत त्यांनी रेशीमगाठी जन्मोजन्मीच्या पाडव्याचा हा सण..! बारामतीत औक्षण करून साजरा केला. असे कॅप्शन दिले आहे.
5 / 5
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि त्यांची पत्नी कुंती यांच्याही औक्षणाचे क्षण आणखी एका व्हिडीओमध्ये टिपले आहेत. 'रेशीमगाठी जन्मोजन्मीच्या, पाडव्याचा हा सण, बारामतीत औक्षण करून साजरा केला,' असं म्हणत सुप्रिया सुळेंनी स्वत:चाही व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओंसोबतच त्यांनी कुटुंबीयांसोबतचा एक खास फोटोसुद्धा पोस्ट केला आहे. 'फॅमिली टाइम' असं कॅप्शन देत त्यांनी हा फोटो पोस्ट केला आहे.