Indian Army : शत्रूच्या सीमेत घुसून भारतीय एअर ट्रूपर्स ऑपरेशन राबवणार, पोखरणमध्ये सैन्याभ्यास
इंडियन आर्मीनं पोखरणमध्ये एअरबोर्न प्रात्याक्षिक आणि सराव करत पश्चिम सीमेवरील आपली तयारी दाखवून दिली आहे. गेल्या वर्षी भारतीय सैन्यानं 14 हजार फुट उंचीवर लडाखमध्ये एअरबोर्न एक्सरसाईज केल्या होत्या.
1 / 6
भारतीय सैन्य दल जगातील प्रबळ सैन्यदलांपैकी एक समजलं जातं. भारतीय सैन्य दलाकडून आधुनिकीकरणाला प्राधान्य देण्यात येतं. इंडिन आर्मीच्यावतीनं पोखरणमध्ये एअरबोर्न प्रात्यक्षिक करण्यात आली.
2 / 6
इंडियन आर्मीनं पोखरणमध्ये एअरबोर्न प्रात्याक्षिक आणि सराव करत पश्चिम सीमेवरील आपली तयारी दाखवून दिली आहे. गेल्या वर्षी भारतीय सैन्यानं 14 हजार फुट उंचीवर लडाखमध्ये एअरबोर्न एक्सरसाईज केल्या होत्या.
3 / 6
आज करण्यात आलेल्या सरावामध्ये इंडियन आर्मीच्या जवानांनी कॉम्बॅट विमानातून पॅराशूटच्या सहाय्यानं हवेत झेप घेतली.
4 / 6
आजच्या प्रात्याक्षिकांमध्ये गायडेड प्रेसिशन एरिएल डिलीव्हरी सिस्टम आणि बॅटल डिल्स ची चाचणी घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी चीनच्या सीमेजवळ अशा प्रकारची प्रात्याक्षिक केली होती.
5 / 6
इंडियन आर्मीनं एअर बोर्न प्रात्याक्षिकांद्वारे कमी वेळात शत्रूच्या सीमेत प्रवेश करुन त्यांच्या सैन्य तळांना कशा प्रकारे उद्धवस्त करण्यात येईल यासंदर्भातील चाचणी करण्यात आली.
6 / 6
इंडियन आर्मीच्या अॅडिशनल डायरेक्टोरेट जनरल ऑफ पब्लिक इन्फोर्मेशननं ट्विट करुन ही माहिती दिली आहे. भारतीय सेनादलानं पोखरणमध्ये ही प्रात्याक्षिक केल्याची माहिती देण्यात आली आहे.