Manoj jarange patil | मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं, पहा स्टेजवरचे काही खास PHOTOS
Manoj jarange patil | मनोज जरांगे पाटील उपोषण सोडण्यास तयार होते. पण त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावं, अशी त्यांची मागणी होती. ती मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली.
1 / 5
मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अखेर आज सुटलं. त्यांच्या उपोषणाचा आज 17 वा दिवस होता. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते.
2 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावामध्ये यावं, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती. ती मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.
3 / 5
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. सरकारच्या शिष्टमंडळाला अखेर यश आलं आहे.
4 / 5
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे स्टेजवर उपस्थित होते.
5 / 5
मनोज जरांगे पाटील यांची समजूत घालण्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. संभाजी भिडे हे देखील मनोज जरांगे पाटील यांना भेटून गेले होते. काल रात्री गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी आज उपोषण सोडलं.