अमित ठाकरे आपल्या सवंगड्यांसह रमले निसर्गाच्या सानिध्यात, पाहा फोटो

| Updated on: Jul 19, 2023 | 11:25 PM

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज आपल्या काही सहकाऱ्यांसह निसर्गाच्या कुशीतील सातपुडा रांगामधील तोरणमाळला भेट दिली.

1 / 5
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

2 / 5
मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थी सेनेची बांधणी, नवीन विद्यार्थ्यांना संघटनेत सामावून घेणे, नव्या विद्यार्थ्यांना संधी देणं,  नवीन नियुक्ती करणे आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणे या निमित्ताने अमित ठाकरे हे खान्देशाच्या दौऱ्यावर आहेत.

3 / 5
अमित ठाकरे यांनी या दौऱ्यादरम्यान आज दिवसभराच्या बैठका आणि गाठीभेटी यातून थोडासा वेळ काढून आज काही सहकाऱ्यांसह निसर्गाच्या कुशीतील सातपुडा रांगामधील  तोरणमाळला भेट दिली. यावेळी त्यांनी डोळे व मनाला सुखावणारा क्षण अनुभवला.

4 / 5
रिमझिम पडणारा पाऊस,धुकं आणि हिरवा शालू पांघरलेल्या डोंगररांगा याचा निसर्गप्रेमी अमित ठाकरेंनी मनसोक्त आनंद लुटला.

5 / 5
आदित्य ठाकरे यांना खान्देशात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तरुणांमध्ये क्रेझ आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांना पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा गराडा जमणे हे साहजिक आहे.