Jitendra Awhad | ‘जितेंद्र आव्हाडांना चौकात उलट टांगून चामडी काढली पाहिजे’, ‘या’ आमदाराचे बोचरे शब्द
Jitendra Awhad | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं, त्याचे पडसाद अजून उमटताना दिसत आहेत. आव्हाडांना उलट टांगून चामडी काढली पाहिजे असं एका आमदाराने म्हटलं आहे.
1 / 5
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू रामचंद्रांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
2 / 5
आव्हाडांच्या या वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. त्यांच्या वक्तव्याच्याविरोधात देशभरात निदर्शने करण्यात आली.
3 / 5
“राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?” असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
4 / 5
शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. "संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांना चौका-चौकात उलट टांगून यांच्या चामड्या काढल्या पाहिजेत. त्याशिवाय यांचे डोके ठिकाणावर येणार नाही" असं किशोर पाटील म्हणाले.
5 / 5
जितेंद्र आव्हाड यांच्यासारखा विकृत माणूस माझ्या जीवनात पाहिला नाही, असं किशोर पाटील म्हणाले. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची राऊत यांच्याबरोबर जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका.