शिवरायांची कर्मभूमी संपूर्ण देशवासियांसाठी प्रेरणास्त्रोत, राष्ट्रपतींची भावना; संभाजी छत्रपतींकडून शिवकालीन वस्तूंची भेट
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind ) यांनी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chh. Shivaji Maharaj) यांच्या रायगडावरील समाधीला अभिवादन केलं. यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद उपस्थित होत्या. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, खासदार संभाजी छत्रपती, राज्यमंत्री आदिती तटकरे यावेळी उपस्थित होत्या.
1 / 7
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind ) यांनी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chh. Shivaji Maharaj) यांच्या रायगडावरील समाधीला अभिवादन केलं. यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद उपस्थित होत्या.
2 / 7
खासदार संभाजी छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दांडपट्टा, भवानी तलवार, आज्ञापत्राची प्रत आणि शिवकालीन होनची (नाणे) प्रतिकृती भेट दिली.
3 / 7
छत्रपती शिवरायांची कर्मभूमी संपूर्ण देशवासियांसाठी प्रेरणास्त्रोत असून रायगड भेटीच्या आठवणी कायम लक्षात राहतील, असं राष्ट्रपती म्हणाले.
4 / 7
रामनाथ कोविंद यांनी रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढं नतमस्तक होणं ही प्रत्येक भारतीयांसाठी गौरव आणि अभिमानाची बाब आहे. रायगडावर येण्याची संधी मिळणं हे माझं सौभाग्य समजतो, असं राष्ट्रपती म्हणाले
5 / 7
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या राजधानीचा हा परिसर असून या बद्दल आमच्या ह्रद्यात तीर्थस्थानाप्रमाणं आदराचं आणि सन्मानाचं स्थान असल्याचंही राष्ट्रपतींनी म्हटलं.
6 / 7
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर जगदीश्वर मंदिर, होळीचा माळ, राज सदर या भागांना राष्ट्रपतींनी भेट दिली. रायगड भेटीचं संपूर्ण श्रेय हे खासदार संभाजी छत्रपती यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, खासदार संभाजी छत्रपती, राज्यमंत्री आदिती तटकरे यावेळी उपस्थित होत्या.
7 / 7
राष्ट्रपती रामनाथ कोविंद दुपारी रोप-वेद्वारे रायगडावर दाखल झाले होते.