Narendra Modi at Kedarnath | पंतप्रधान मोदी केदारनाथाच्या चरणी लीन…..
काही वर्षांपूर्वी केदारनाथचं मोठं नुकसान झालं. ते अकल्पनीय होतं. केदारनाथचं नुकसाना पाहून पुन्हा केदारनाथ उभं राहिल असं कुणाला वाटलं नव्हतं. मात्र, केदारनाथ पुन्हा त्याच वैभवानं उभे राहील असं माझं मन सांगत होतं. आणि झालंही तसंच. केवळ ईश्वराच्या कृपने केदारनाथचं विकास कार्य पूर्ण होऊ शकलं- पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
-
आज केदारनाथच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी केदारनाथमध्ये आदिगुरू शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण केले. आदिगुरू शंकराचार्यांच्या पुतळ्याचे काम 2019 मध्ये सुरु करण्यात आले होते. ही मूर्ती 12 फूट उंच आणि 35 टन वजनाची आहे.
-
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचव्यांदा केदारनाथच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. केदारनाथ दौऱ्यात ते पावणे चारशे कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांनी केली.
-
-
पुनर्निर्माण कामांच्या पायाभरणीमध्ये मंदाकिनीवरील पूल आणि तीर्थक्षेत्रातील पुजार्यांसाठी निवासस्थाने, यामध्ये सरस्वती आणि मंदाकिनी नद्यांच्या काठावर सुरक्षा भिंती,केदारनाथ धाममध्ये करण्यात आलेल्या चार गुहांचाही समावेश आहे.
-
-
2013 मध्ये आलेल्या महाप्रलयामुळं येथे झालेले नुकसान अकल्पनीय होते. त्यामुळे इथे येणाऱ्या लोकांना वाटायचे,की हे आमचे केदारधाम पुन्हा उभे राहील का? पण माझा आतला आवाज सांगत होता की तो पूर्वीपेक्षा अधिक अभिमानाने उभा राहील असेही मोदी म्हणाले.
-
-
केदारनाथमध्ये देवाच्या चरणी लीन व्हायला आलोय, असे म्हणत मोदींनी केदारनाथ मंदिरात पूजा केदारनाथचा रुद्राभिषेक आणि आरती देखील करण्यात आली.
-
-
भारताला महान ऋषींची परंपरा, देशाच्या कानाकोपऱ्यात महान संतांची परंपरा आहे. भारतीय तत्त्वज्ञान मानवी कल्याणाविषयी बोलते. जीवनाकडे समग्र, समग्र दृष्टीने पाहते. सत्याची जाणीव समाजाला करून देण्याचे काम आदि शंकराचार्यांनी केले असेही ते म्हणाले.
-
-
केदारनाथ धाम हे चार धामपैकी एक प्रमुख धाम आहे. तसेच केदारनाथच्या मंदिराचा समावेश हा 12 ज्योतिर्लिंगांमध्ये होत असल्याने या मंदिराला विशेष महत्त्व आहे.
-
-
12 ज्योतिर्लिंग, अनेक शिवालय, शक्ती धाम, अनेक तीर्थ क्षेत्रांशी संबंधित महापुरुष, शंकराचार्यांच्या परंपरेशी जोडले गेलेले ऋषी मुनी, श्रद्धाळू सर्वच जण आपल्याला आशीर्वाद देत असल्याचेही त्यांनी सांगितले.