राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर रक्षाबंधन साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बंधू रणजित पवार यांना सुप्रिया सुळे यांनी राखी बांधली.
‘नेहमीच कामानिमित्त लवकर बाहेर पडावं लागतं, मात्र आज रक्षाबंधन असल्यानं ताईची राखी बांधल्याशिवाय बाहेर पडण्याची मुभाच नसते. माझ्या ताईंना आणि राज्याच्या हितासाठी अविरत काम करणाऱ्या राज्यातील इतरही असंख्य बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!’ असं म्हणत रोहित पवार यांनी राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील आज रक्षाबंधन सण अत्यंत साधेपणानं साजरा केला. टोपे यांचं औक्षण करून त्यांच्या बहिणीनी राखी बांधली तसेच त्यांचा आशीर्वाद देखील घेतला. जालन्यातील ऋषी पार्कमध्ये टोपे यांनी बहिणीकडून राखी बांधून घेतली.राज्यात कोरोनाचं थैमान सुरू आहे त्यामुळे यापुढील सण अत्यंत साधेपणाने साजरे करून कोरोनाचे नियम पाळा असं आवाहन टोपे यांनी केलंय.
मुंबईच्या महापौर कस्तुरबा रुग्णालयात रक्षाबंधन साजरा करत आहेत , डॉक्टर आणि वोर्डबॉय , नर्सेससोबत हा सण साजरा केला.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने आमदार प्रसाद लाड यांना राखी बांधून दिवसाची सुरुवात केलीय. बहीण भावाचं नात हे आश्वस्त करणार नात असून या नात्यातला दृढ विश्वास असाच बहरत राहो अशी प्रार्थना त्यांनी केलीय. संकटाच्या काळात प्रत्येक अडीअडचणीला धावून येणारे हजारो भाऊ या महाराष्ट्रात आहेत त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा चित्रा वाघ यांनी दिल्यात. प्रसाद लाड यांनीही चित्राताई यांनी महिलविरोधात होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या विरोधात उभारलेल्या लढ्याच कौतुक करत या लढ्याला असच बळ मिळो अश्या आशीर्वादरुपी शुभेच्छा चित्रा वाघ यांना दिल्यात..
राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पदमसिंह पाटील यांनी त्यांची बहीण पुष्पाताई पाटोदेकर यांच्या उस्मानाबाद येथील घरी जाऊन राखी बांधली यावेळी त्यांनी एकमेकांना पेढा भरवून औक्षण केले. वयाच्या 81 व्या वर्षी डॉ पदमसिंह पाटील यांनी त्यांची मोठी 83 वर्षीय बहिणीच्या हातून राखी बांधली आणि आशीर्वाद घेतले. डॉ पदमसिंह पाटील हे राज्यातील राजकारणातील एक मोठे प्रस्थ आहेत.