त्रास तर होणारच पण…, जिनिलीयासोबत मतदान केल्यानंतर रितेश देशमुख काय म्हणाले?
आज देशात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. 11 राज्यातील लोकसभेच्या एकूण 93 जागांवर मतदान होतय. महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान होतय. अभिनेते रितेश देशमुख यांनी देखील कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला आहे.
1 / 5
लातूर येथील बाबळगाव मतदान केंद्रावर रितेश देशमुख यांनी कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे. आई वैशाली देशमुख आणि पत्नी जिनिलीया देशमुख यांच्यासोबत रितेश यांनी मतदान केलं आहे.
2 / 5
रितेश देशमुख म्हणाले, 'आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांनी मतदान करावं. मित्र, आई - वडील, कुटुंबातील सर्वांना घेऊन मतदान केंद्रावर जा आणि मतदान करा.'असं आवाहन रितेश देशमुख यांनी केलं आहे.
3 / 5
'मी फक्त आजच्या दिवसासाठी मुंबईहून लातूर येथे मतदान करण्यासाठी आलो आहे. आज रात्री ट्रेनपकडून परत जाईल. उन आहे त्रास तर होणारच आहे. पण थोडा त्रास आपण आपल्या देशासाठी घ्यायला हवा. मतदानासाठी जाणं त्रास आहे असं वाटतं असेल तर आजचा दिवस हा त्रास सहन करा...', असं देखील रितेश म्हणाले.
4 / 5
मदतान केल्यानंतर अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांनी देखील जनतेला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे. देशमुख कुटुंबाचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
5 / 5
लातूर येथील बाबळगाव मतदान केंद्रावरील ही दृष्य आहेत. बाबळगाव हे देशमुखांचं गाव आहे. म्हणून संपूर्ण देशमुख कुटुंबाने बाबळगाव येथे मतदानाचा हक्क बजावला आहे.