RRB-NTPC निकालाविरोधात बिहारचे विद्यार्थी आक्रमक, रेल्वेचं इंजिन पेटवलं, सितामढीत पोलिसांची फायरिंग
रेल्वे विभागातील आरआऱबी एनटीपीसी सीबीटी परीक्षा एकच्या निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांनी केला आहे. एनटीपीसी सीबीटी परीक्षा निकाल आणि सीबीटी परीक्षा भाग दोन विरोधात बिहारमधील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
1 / 7
रेल्वे विभागातील आरआऱबी एनटीपीसी सीबीटी परीक्षा एकच्या निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांनी केला आहे. एनटीपीसी सीबीटी परीक्षा निकाल आणि सीबीटी परीक्षा भाग दोन विरोधात बिहारमधील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. संतप्त विद्यार्थ्यांनी आरा स्टेशनजवळील एका पॅसेंजर ट्रेनमध्ये आग लावली.
2 / 7
विद्यार्थ्यांनी आरा स्टेशनवरील पश्चिम गुमटी जवळ उभ्या असलेल्या सासाराम आरा पॅसेंजरच्या इंजिनमध्ये आग लावली, . त्यानंतर लोको पायलट रवि कुमारनं इंजिनला इतर डब्यांपासून वेगळं केलं आणि त्यानंतर स्वत: चा जीव वाचवण्यासाठी इंजिनमधून उडी मारली. लोको पायलटला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रेल्वेचं इंजिन जळून खाक झालं आहे.
3 / 7
एनटीपीसी परीक्षा पॅटर्नमधील बदल आणि निकालातील गैरप्रकाराविरोधात नाराज विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन करत रेल्वे ट्रॅक जाम केला होता. आंदोलनामुळं संबंधित ट्रॅकवरील वाहतूक बंद झाली होती. यानंतर सासाराम आरा पॅसेंजर ट्रेनला आऊटर जवळ थांबवण्यात आलं होतं. मात्र, विद्यार्थी तिथं पोहोचले आणि त्यांनी ट्रेनच्या इंजिनला आग लावून दिली. यानंतर इंजिन जळून गेलं.
4 / 7
सितामढी रेल्वे स्टेशनवर आंदोलनावेळी काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. एएनआयनं जारी केलेल्या व्हिडीओमध्ये पोलीस फायरिंग करताना दिसून येत आहेत तर विद्यार्थी दगडफेक करत असल्याचं दिसून आलं आहे.
5 / 7
बिहारच्या नवादामध्ये देखील रेल्वे स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या गाडीत आग लावण्यात आली. मंगळवारी शेकडोच्या संख्येंनं आंदोलन करणारे विद्यार्थी नवादा रेल्वे स्टेशनवर पोहोचले आणि त्यांनी रेल्वे ट्रॅक जाम केला. तिथं विद्यार्थ्यांनी आरआरबी विरोधात घोषणाबाजी केली. (पाटणा स्टेशनवरील आंदोलनाचा फोटो)
6 / 7
नवादा स्टेशनवर यानंतर विद्यार्थ्यांनी दुरुस्तीच्या कामांवर असलेल्या गाडीमध्ये आग लावून दिली. मात्र, फायर ब्रिगेडनं त्या आगीवर नियंत्रण मिळवलं. (आरा स्टेशनवरील फोटो)
7 / 7
रेल्वे ट्रॅक जाम झाल्याच्या बातम्या आल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि आरपीएप अधिकारी आणि जवान एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थी यांच्यात थोडा वेळ झटापट झाली. यानंतर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शांत केलं. नवादा रेल्वे स्टेशन वर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. (पाटणा स्टेशनवरील फोटो)