Russia Ukraine War : रशिया यूक्रेनमध्ये कीव शहरावरुन संघर्ष, रशियन फौजांना रोखण्यासाठी नद्यांवरील पूल उडवले
ओडेसा येथील सर्व सीमेवर रशियानं कब्जा केलाय. यूक्रेनची स्टेट बॉर्डर गार्ड सूमी शहरात रशियाशी टक्कर सुरु आहे. रशियाचे 800 सैनिक मारल्याचा दावा यूक्रेनच्यावतीनं करण्यात आलाय.
1 / 7
2 / 7
रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांना पहिल्या दिवशी तोंड दिल्यानंतर यूक्रेननं देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवातकेलीय. राजधानी कीवमध्ये भीषण लढाई होण्याची शक्यता आहे. यूक्रेनच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून आक्रमक प्रतिहल्ले केले जात आहेत. यूक्रेनकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार सात एअरक्राफ्ट पाडले आहेत. हल्ले प्रतिहल्ल्यांनी कीव हादरुन गेलंय.
3 / 7
यूक्रेनचे गृहमंत्री एंटन गेरेश्चेंको यांच्यानुसार रशियाचं सैन्य क्रुझ आणि बॅलेस्टिक मिसाईलद्वारे हल्ले करत आहे. सकाळी सकाळी यूक्रेनच्या कीव शहरातील नुकसानाचे फोटो समोर आले आहेत. कीवच्या मैदानातील स्क्वेअरमध्ये शांतता दिसून आली.
4 / 7
एका इमारतमीध्ये रशियाच्या मिसाईलचा हल्ला झाल्याचं दिसून आलं. इमारतीला आग लागल्यानं ती जळून खाक झाली. यूक्रेनमधील नुकसानाचे फोटो आता प्रसिद्ध होत आहेत.
5 / 7
रशियानं यूक्रेनचं दक्षिणेकडील शहर ओडेस्सावर देखील हल्ला केला आहे. सकाळपासून त्या शहरात चार ते पाच धमाके झाले आहेत. युद्धामुळं ओडेसामधील विमान सेवा बंद झालीय. रशियाकडून इमारतींवर रॉकेट हल्ले केले जात आहेत. रशियन फौजा यूक्रेनमध्ये टँक आणि मोर्टारसह घुसल्या आहेत.
6 / 7
रशियानं काल यूक्रेनवर चारी बाजूनं हल्ला केला होताय. काही तासांमध्येच रशियन फौजा यूक्रेनची राजधानी कीवमध्ये पोहोचल्या होत्या. कीववर लवकरच रशिया ताबा मिळवेल, अशी स्थिती आहे. यूक्रेनच्या पोलिसांच्या माहितीनुसार रशियानं पहिल्यादिवशी 203 हल्ले केले होते. रशियानं केलेल्या हल्ल्यात दुसऱ्या दिवशी यूक्रेनची राजधानी कीव आणि इतर शहरात खळबळ उडाली आहे. रशियन सैन्याचा यूक्रेनच्या राष्ट्रपतींना पकडण्याचा प्रयत्न असल्याचं समोर आलंय. यूक्रेनमधून लोक पोलंड, हंगेरी, रोमानिया या देशात जात आहेत.
7 / 7
यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांनी रशियाच्या पहिल्या दिवसाच्या हल्ल्यात 137 लोकांचा मृत्यू झालाय. तर, शेकडो लोक जखमी झाले आहेत. जेलेंस्की यांनी रशियानं केवळ सैन्य दलांवर नाहीत रहिवासी ठिकाणांवरही हल्ला केल्याचं म्हटलंय. रशियानं चेर्नोबिलचा अणूउर्जा प्रकल्प ताब्यात घेतलाय. त्यामुळं जगाचं टेन्शन वाढलंय.