Russia Ukraine : युद्धाचे चटके, जीव वाचवण्यासाठी निवारागृहांचा आसरा, नागरिकांची पोलंडला जाण्यासाठी धडपड
रशियानं हल्ला केल्यामुळं यूक्रेनमधील विमान सेवा थांबवण्यात आली आहे. यामुळे यूक्रेनमधील लोकांनी कारमधऊन पोलंडला जायला सुरुवात केलीय. या फोटोत एक महिला देश सोडताना पाहायला मिळत आहे.
1 / 6
रशिया आणि यूक्रेनच्या दरम्यान सुरु असलेल्या युद्धामुळं सामान्य नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे. रशियाच्या हल्ल्यामुळं यूक्रेनच्या नागरिकांनी देश सोडण्यास सुरुवात केली आहे. ज्या लोकांचा जीव वाचला आहे ते लोक निवारा गृहात आसरा घेत आहेत.
2 / 6
यूक्रेनच्या काही लोकांनी युद्ध सुरु झाल्यानंतर नागरिकांनी जवळच्या पोलंडमध्ये आसरा घेतला आहे. पोलंडमधील प्रेजेमिसली शहरातील रेल्वेस्टेशनमध्ये लोक थांबले आहेत. हे रेल्वे स्टेशन यूक्रेन आणि पोलंडच्य सीमेजवळ आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर अनेक जण पोलंडमध्ये गेले आहेत.
3 / 6
रशियानं हल्ला केल्यामुळं यूक्रेनमधील विमान सेवा थांबवण्यात आली आहे. यामुळे यूक्रेनमधील लोकांनी कारमधऊन पोलंडला जायला सुरुवात केलीय. या फोटोत एक महिला देश सोडताना पाहायला मिळत आहे.
4 / 6
हा फोटो प्रेजेमिसली रेल्वे स्टेशन येथील आहे. तिथं लोक शरण आलेले आहेत. त्या ठिकाणी जेवण बनवण्याचं काम सुरु आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर लोकं घाबरलेली आहेत.
5 / 6
या फोटोत रशियाच्या हल्ल्यामुळं घाबरलेली महिलला लपल्याचं दिसून येत आहे. कीव शहरावर रशियानं जोरदार हल्ले करण्यात आले आहेत.
6 / 6
रशियानं यूक्रेनचं दुसरं महत्त्वाचं शहर खारकीव मध्ये हल्ले केले आहेत. तिथं एक व्यक्ती मिसाईलच्या अवशेषाजवळ उभा राहिलेला पाहायला मिळतोय.