'मुसंडी' चित्रपटाच्या टीमने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी या सिनेमाला शुभेच्छा दिल्या.
भेटीदरम्यान मुख्यमंत्री आणि 'मुसंडी' चित्रपटाची टीम तसंच छोटा पुढारी घन:श्याम दराडे यांच्यात संवाद झाला. या चित्रपटावर या दोघांमध्ये चर्चा झाली.
यावेळी बोलताना घनश्याम दराडे याने 'मुसंडी'वर भाष्य केलं. त्याला मुख्यमंत्र्यांनी मध्येच रोखलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब मुसंडी चित्रपट पाहणार असल्याचं आश्वासन ही दिलं.
एकनाथ शिंदेंनी दहा महिन्यांआधी मुसंडी मारलेलीच आहे. पण आता आमची 'मुसंडी' पाहून एकनाथ शिंदेदेखील मुसंडी मारणार आहेत, असं घन:श्यामने म्हटलं.
घन:श्यामला रोखलं अन् एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही आधी मुसंडी मारली आहे. ती पाहून तुम्ही सिनेमा केला. त्यानंतर एकच हशा पिकला. त्यावर तुम्ही आणखी मुसंडी मारावी, अशी इच्छा आहे, असं घन:श्याम म्हणाला.