EVM आणि VVPAT पावत्यांबद्दल सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
ईव्हीएम मशीनवर अनेक वेळा आरोप झाले आहेत. भाजपवर तर ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. आता सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या.
1 / 6
EVM आणि VVPAT च्या पावत्यांबद्दल सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. सामाजिक कार्यकर्ते अरुण कुमार अग्रवाल आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स यांनी व्हीव्हीपॅटच्या सर्व पावत्यांची पडताळणी व्हावी, यासाठी याचिका केली आहे.
2 / 6
आपण ज्या उमेदवाराला किंवा चिन्हाला मतदान केलंय., ते त्याच उमेदवाराला झालं आहे की नाही., याच्या पडताळणीसाठी व्हीव्हीपॅटचा उपयोग होतो.
3 / 6
समजा तुम्ही भोवरा चिन्ह असलेल्या व्यक्तीला मतदान केलं., ते मतदान त्याच व्यक्तीला गेलं आहे की नाही., यासाठी मतदानाच्या 5 सेकंदानंतर व्हीव्हीपॅट मशीनवर एक पावती जनरेट होते. त्यात आपण जे बटण दाबलं, त्यालाच ते गेलंय याची खातरजमा केली जाते.
4 / 6
मतमोजणीवेळी ईव्हीएम योग्य आहे यासाठी एका लोकसभा मतदारसंघातल्या 5 ईव्हीएम मशीनची मतं आणि व्हीव्हीपॅटनं जनरेट केलेल्या पावत्यांची पडताळणी केली जाते.
5 / 6
मात्र ही पडताळणी सध्या एका लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभेत 5 ईव्हीएममशीनचीच केली जाते. याचिकेत सर्वच व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
6 / 6
सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला याबाबत नोटीस बजावली आहे. सर्व ईव्हीएम मशीनवरच्या व्हीव्हीपॅट पावत्या पडताळल्या जावू शकतात का यावर निवडणूक आयोगाला उत्तर सादर करायचं आहे. त्यामुळे यापुढच्या सुनावणीत काय होतं., ते पाहणं महत्वाचं असेल.