Inside Story | उद्धव ठाकरे प्रचंड संतापले, बाळासाहेव ठाकरे स्मारक पाहणी दौऱ्यादरम्यान नेमकं काय घडलं?
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाची आज पाहणी केली. यावेळी MMRDA चे चेअरमन श्रीनिवासन यांच्या अनुपस्थितीवरुन चांगलंच नाट्य रंगलेलं बघायला मिळालं. अखेर उद्धव ठाकरे पोहोचल्यानंतर काही वेळाने MMRDA चे चेअरमन स्मारकस्थळी आले. पण ते स्मारकस्थळी नेमके कसे उपस्थित राहीले, यामागेही रंजक घडामोडी आहेत.
1 / 6
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आज खूप महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. उद्योगपती गौतम अदानी यांना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीगाठी सुरु असतानाच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या मातोश्री निवासस्थानाहून बाहेर निघाले आणि दादरला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामस्थळी पाहोचले. त्यांच्या या पाहणी दौऱ्यादरम्यान चांगलंच नाट्य बघायला मिळालं.
2 / 6
उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकस्थळी पोहोचले तेव्हा MMRDA चे चेअरमन श्रीनिवासन हे नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरे खूप संतापले होते. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पाहणी दौरा हा श्रीनिवासन यांच्याशी संपर्क करुन आणि वेळ ठरवून निश्चित करण्यात आला होता. पण ठाकरे-शिंदे राजकीय संघर्षामुळे श्रीनिवासन यांनी ऐनवेळी पाहाणीला जाणं टाळलं. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या शासकीय बैठकीत बिझी असल्याचं कारण दिलं.
3 / 6
उद्धव ठाकरे स्मारकस्थळी पोहोचले तेव्हा सुरुवातीला श्रीनिवासन उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे यापूर्वीही श्रीनिवासन यांना सांगून त्यांनी ज्युनिअर अधिकारी पाठवले होते, अशी चर्चा आहे.
4 / 6
दुसरीकडे शिंदे-ठाकरे संघर्षात श्रीनिवास यांची कोंडी झाली. ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर हे सुरुवातीपासून मोबाईल फोनद्वारे श्रीनिवासन यांच्या संपर्कात होते. उशिरा का होईना पण उद्धव ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाच्या पाहाणी दौऱ्यात श्रीनिवासन यांना आणण्यात मिलिंद नार्वेकर यांनी महत्वाची भूमिका बजावली.
5 / 6
श्रीनिवासन यांना स्मारकाच्या जागेत येण्यासाठी आणि त्यांच्यावर असलेला ताण हलका करण्यासाठी मिलिंद नार्वेकर पुढे गेले. विशेष म्हणजे या दरम्यान मी प्रसारमाध्यमां समोर बाईटसाठी येणार नाही, अशी श्रीनिवासन यांची भूमिका होती. पण उद्धव ठाकरे यांच्या शेजारी त्यांना बळेबळे उभे रहावे लागले.
6 / 6
तिथे उभे असताना श्रीनिवासन यांच्या चेहऱ्यावर तणाव होता. ते मनापासून इथे आले नव्हते हे त्यांच्या देहबोलीतून स्पष्टपणे जाणवत होते.तर दुसरीकडे श्रीनिवासन येणार म्हणून उद्धव ठाकरे यांना आपला पाहाणी कार्यक्रम अर्धातास लांबवावा लागला.