Photo ! जम्मू-काश्मीरमध्येही निवडणुकीचे वारे; जिल्हा विकास परिषदेसाठी शांततेत मतदान
केंद्र सरकारने संविधानातील अनुच्छेद ३७० हटवून जम्मू-काश्मीरला देण्यात आलेली विशेष स्वायत्ता काढून घेतली आहे. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.
1 / 6
केंद्र सरकारने संविधानातील अनुच्छेद ३७० हटवून जम्मू-काश्मीरला देण्यात आलेली विशेष स्वायत्ता काढून घेतली आहे. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.
2 / 6
जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषद (डीडीसी) निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. आज जिल्हा विकास परिषदेच्या 33 जागांसाठी मतदान होत आहे. यात काश्मीर खोऱ्यातील 16 आणि जम्मू क्षेत्रातील 17 जागांचा समावेश आहे.
3 / 6
28 नोव्हेंबरपासून जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. 19 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. एकूण आठ टप्प्यात या ठिकाणी मतदान होत असून 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
4 / 6
राजौरी, अनंतनागसह विविध भागात सकाळपासून मतदान सुरू झालं असून मतदान केंद्रांवर रांगा लावून नागरिकांनी मतदान केलं. यावेळी महिलांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
5 / 6
मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज सकाळी अनंतनाग येथे मतदान सुरू असताना गोळीबार झाला. यावेळी अनीश-उल-इस्लाम नावाचा एक उमेदवार जखमी झाला आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं.
6 / 6
जम्मूच्या चाक जाफर गावातील मतदारांनी तर मतदान केल्यानंतर ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केला.