महेश भट्टची लेक पूजा भट्ट ही सध्या बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झालीये. विशेष म्हणजे टाॅप 5 मध्ये पूजा भट्ट हिचा समावेश झाला आहे.
पूजा भट्ट बिग बाॅसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसत आहे. मात्र, आपल्या एका विधानामुळे पूजा भट्ट ही मोठ्या वादात सापडलीये.
एका टास्कमध्ये पूजा भट्ट ही घरातील सदस्यांना थेट छोटे लोक असे म्हटली आहे. यामुळे आता पूजा भट्ट ही लोकांच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका क्लिपमध्ये स्पष्टपणे पूजा भट्ट ही घरातील इतर लोकांना 'छोटे लोग' असे म्हणत आहे.
यामुळेच पूजा भट्ट ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये. मात्र, या विधानानंतर सफाई देताना देखील पूजा भट्ट ही दिसली आहे.