मराठी चित्रपट सृष्टीतील लाडकी अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होतेय.
आता तिनं सुंदर काळ्या रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
सध्या पूजा महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या कार्यक्रमासाठी परिक्षकाची भूमिका साकारत आहे.
पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये क्षणभर विश्रांती या चित्रपटातून पाऊल ठेवलं होतं. आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, निळकंठ मास्तर अशा हिट चित्रपटांमध्ये पूजाने अभिनय केला आहे.