Post Office Scheme | पोस्टाची भन्नाट योजनेत पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्यात मिळतील बक्कळ पैसे
पोस्ट ऑफिसमध्ये मासिक उत्पन्न योजना (POMIS) ही अशीच एक छोटी बचत योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला दरमहा पैसे मिळवण्याची संधी मिळते.
एकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघांचा विमा, केवळ 4 हजारांत सुरू करा पॉलिसी
Follow us on
पोस्ट ऑफिसमध्ये मासिक उत्पन्न योजना (POMIS) ही अशीच एक छोटी बचत योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला दरमहा पैसे मिळवण्याची संधी मिळते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम कमवू शकता. या योजनेंतर्गत तुम्ही एकटे किंवा जॉईंट अकाऊंट उघडू शकता. तसेच एकरकम रक्कम जमा करू शकता.
Post Office Recurring Deposit Account
15 ऑगस्ट 2021: रविवारी या दिवशी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल, 16 ऑगस्ट 2021: पारसी नववर्षामुळे या दिवशी महाराष्ट्रातील बेलापूर, मुंबई आणि नागपूर विभागांमध्ये बँकेची सुट्टी असेल. 19 ऑगस्ट 2021: या दिवशी मोहरम, आगरतळा झोन, अहमदाबाद विभाग, बेलापूर झोन, भोपाळ झोन, हैदराबाद विभाग, जयपूर विभाग, जम्मू विभाग, कानपूर विभाग, कोलकाता विभाग, लखनऊ विभाग, मुंबई विभाग, नागपूर विभाग, नवी दिल्ली झोन, पटना झोन, रायपूर झोन, रांची झोन आणि श्रीनगर झोनमध्ये बँकांना सुट्टी असेल.
HDFC Mutual Fund
या योजनेंतर्गत खातं उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असणं आवश्यक आहे. खातं उघडण्यासाठी तुम्हाला आयडी पुरावा द्यावा लागेल. यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, डीएल किंवा पासपोर्ट द्यावं लागेल. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो सुद्धा खातं उघडण्यासाठी महत्त्वाचे आहेत. अॅड्रेस प्रूफसाठी एखादं ओळखपत्र, लाईट बिल, नगरपालिका बिल, निवासी प्रमाणपत्र किंवा शासकीय विभागाने दिलेला अन्य पुरावा असावा.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी चालू तिमाहीत सरकारने वार्षिक व्याज दर 6.6 टक्के निश्चित केला आहे. जर तुम्ही योजनेत 9 लाख रुपये जमा केले तर या रकमेवरील 6.6 टक्के वार्षिक व्याजदराप्रमाणे एकूण व्याज 59,400 रुपये असणार आहे.