भारतीय टपाल खात्याकडून बँकिग चार्जेस आणि बचत खात्यावरील व्याजदरात बदल केले आहेत. त्यामुळे आता बचत खात्यावर कमी व्याज मिळेल. याशिवाय, घरपोच सेवांसाठीच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून यापूर्वी डोअरस्टेप बँकिंगवर कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. मात्र, आता IPPB च्या डोअरस्टेप सेवांसाठी प्रत्येकवेळी 20 रुपये शुल्का आकारले जाईल.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून बचत खात्यातील ठेवीची कमाल मर्यादा एका लाखावरून दोन लाख रुपये इतकी केली आहे. तुमच्या खात्यात दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम झाली तर ती परस्पर पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होईल. पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यावर सध्या 4 टक्के इतके व्याज मिळते.
पोस्ट ऑफिस