आम्हाला मूल नको…; बेबी प्लॅनिंगच्या प्रश्नावर प्रार्थना बेहरेचं उत्तर

| Updated on: Apr 18, 2024 | 3:21 PM

प्रार्थना बेहरे आणि तिच्या पतीने मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रार्थनाने यामागचं कारण सांगितलं आहे. या निर्णयात कुटुंबीयांनीही पाठिंबा दिल्याचं तिने सांगितलं.

1 / 5
अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या कोणत्या चित्रपट किंवा मालिकेत झळकत नसली तरी सोशल मीडियाद्वारे ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. 2017 मध्ये तिने अभिषेक जावकरशी लग्न केलं. सोशल मीडियावर आणि मुलाखतींमध्येही अनेकदा प्रार्थनाला गरोदरपणाविषयी प्रश्न विचारले जातात.

2 / 5
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रार्थनाने 'बेबी प्लॅनिंग'विषयीच्या प्रश्नावर स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, "मला आणि माझ्या पतीला प्राणी खूप आवडतात. त्यामुळे मूल नको, असं आम्ही ठरवलं होतं. आमच्या घरी असलेले प्राणी हीच आमची मुलं आहेत."

3 / 5
"या सर्व प्राण्यांची आम्ही खूप काळजी घेतो. त्यांचा सांभाळ आम्ही पोटच्या मुलांसारखंच करतो. मूल होऊ न देण्याचा आमचा निर्णय मोठा होता. पण यात आमच्या कुटुंबीयांनीही पाठिंबा दिला. त्यांनी आम्हा दोघांना समजून घेतलं", असं तिने सांगितलं.

4 / 5
प्रार्थना आणि तिचं कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून अलिबागमध्ये राहत आहेत. सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या खास मुलाखतीत तिने मुंबई सोडण्यामागचं कारण सांगितलं. अलिबागच्या जागेत घोडे, गायी, कुत्रे पाळल्याचं ती म्हणाली.

5 / 5
“मालिका सुरू असताना आम्ही जुहूला राहायचो. पण सतत गर्दी, वाहतूक कोंडी यांमुळे मुंबईचा वैताग येऊ लागला. स्वत:साठी काहीच वेळ देता येत नव्हतं. अलिबागमध्ये थोडं निवांत राहता येईल असं वाटलं. इथे मला माझी पेंटिंगचीही आवड जपता येते. मी सगळीकडे बिनधास्त मेकअपशिवाय फिरते," असं प्रार्थनाने स्पष्ट केलं.