'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम जोडी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतंच दोन्ही कुटुंबीयांचं व्याहीभोजन पार पडलं. त्याचे फोटो प्रथमेश आणि मुग्धाने सोशल मीडियावर पोस्ट केले.
प्रथमेश आणि मुग्धाच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. यावेळी प्रथमेशने पारंपरिक कुर्ता-पायजमा आणि मुग्धाने काठपदराची साडी नेसली होती. दोघांचा पारंपरिक अंदाज नेटकऱ्यांना खूपच आवडला.
प्रथमेश-मुग्धाच्या फोटोवर कमेंट करत एका युजरने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. 'मस्त जोडी आहे. फक्त प्रथमेशला बोल रोमँटिक असल्यासारखा दिस. सत्यनारायणाच्या पूजेला आलेल्या भटजीसारखा उभा राहू नको. बाकी खूप छान,' अशी कमेंट एका युजरने केली.
ट्रोलरला प्रथमेश लघाटेनं सडेतोड उत्तर दिलं आहे. 'अण्णा.. व्याहीभोजन ही आपली परंपरा आहे. ट्रेडिशनल गोष्टीत कुठं रोमान्स घुसडवता राव? एवढं कन्फ्युजन?,' अशी कमेंट प्रथमेशने केली.
प्रथमेशनं काही दिवसांपूर्वी फेसबुकवर पोस्ट लिहित मुग्धासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. सारेगमप लिटिल चॅम्प्स मराठीमुळेच मुग्धा आणि प्रथमेशची पहिल्यांदा भेट झाली आणि तिथूनच दोघांचे सूर जुळले. सारेगमप लिटिल चॅम्प्सपासून सुरु झालेला या दोघांचा प्रवास आता लग्नापर्यंत येऊन पोहोचला आहे.