नाशिकमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे येवल्यात अनेक वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
मनमाडमध्ये झालेल्या जोरदार पावसाने शहर परिसरातील लहान-मोठे बंधारे, विहिरी फुल्ल भरूल्याने ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे यावर्षीचा पाणीप्रश्न तूर्तास तरी मिटला आहे.
नाशिक जिल्ह्याला सकाळपासून आज पावसाने झोडपले. त्यात मनमाडलाही जोरदार फटका बसला. शहराच्या अनेक भागात पाणी तुंबले. पिकांचेही नुकसान झाले.
येवल्यामध्ये भर दुपारी झालेल्या पावसाने शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. रस्त्यावर अक्षरशः तळे साचले होते. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.