अफगाणिस्तानातील सत्ताबदलाचा भारताला फटका, सणासुदीच्या काळात बदाम, मनुक्यांचा भाव वाढणार
Dryfruits | अफगाणिस्तानातील मालाची आयात आणि निर्यात थांबली आहे. परिणामी अफगाणिस्तानमधून निर्यात होणाऱ्या वस्तुंचा बाजारपेठेत तुटवडा जाणवत आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.
-
-
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अफगाणिस्तानातील घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. तालिबानने अफगाणिस्तानातील प्रमुख शहरांवर ताबा मिळवल्याने येथील व्यापार पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील मालाची आयात आणि निर्यात थांबली आहे. परिणामी अफगाणिस्तानमधून निर्यात होणाऱ्या वस्तुंचा बाजारपेठेत तुटवडा जाणवत आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.
-
-
अफगाणिस्तानात अक्रोड, बदाम, मनुके अशा बहुतांश सुकामेव्याची शेती होते. त्यामुळे भारत मोठ्याप्रमाणावर अफगाणिस्तानातून सुकामेवा आयात करतो. मात्र, आता हा व्यापारच ठप्प असल्याने भारतीय बाजारपेठेत सुकामेव्याचा भाव वाढायला लागला आहे.
-
-
अफगाणिस्तानात मसाल्याच्या पदार्थांचीही शेती केली जाते. व्यापार ठप्प झाल्याने भारतीय बाजारपेठेत मसल्यांचेही भाव वाढण्याची शक्यता आहे.
-
-
संग्रहित छायाचित्र.
-
-
तालिबानने अफगाणिस्तानातील प्रमुख शहरांवर ताबा मिळवण्यास सुरुवात केली तेव्हाच या संकटाची चाहुल लागली होती. ऑगस्ट महिन्यात बदामाचा प्रतिकिलो दर 680 रुपयांवरुन 1050 रुपये इतका झाला होता. तसेच काजू , पिस्ता आणि अक्रोडच्या किंमतीतही वाढ पाहायला मिळाली होती.
-
-
सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे सुकामेव्याला मोठ्याप्रमाणावर मागणी असते. मात्र, सुकामेव्याचा सध्याचा दर पाहता सामान्यांना आपल्या आवडीला मुरड घालावी लागण्याची शक्यता आहे.