Marathi News Photo gallery Private jet to suv cars other expensive gifts given by the Ambani family members Nita Ambani and Mukesh Ambani
अंबानी कुटुंबीय एकमेकांना काय भेटवस्तू देत असतील बरं? किंमत पाहून तुमचेही डोळे विस्फारतील!
जगातील सर्वांत श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या अंबानींच्या कुटुंबात जेव्हा एकमेकांना भेटवस्तू देण्याची वेळ येते, तेव्हा पैशांचा विचार तर अजिबात केला जात नाही. विविध समारंभात किंवा वाढदिवसानिमित्त अंबानी कुटुंबीयांनी एकमेकांना अत्यंत महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. त्या कोणकोणत्या आहेत, ते पाहुयात..
1 / 9
कुटुंबातल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला भेटवस्तू देताना आपण पैशांचा विचार करत नाही. संबंधित व्यक्तीला कोणती वस्तू आवडते, कोणी उपयोगी पडू शकते याचा विचार करून आपण भेटवस्तू देतो. पण जर का ते कुटुंब अंबानींचं असेल, तर भेटवस्तू किती महागड्या असतील याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. अंबानी कुटुंबीय एकमेकांना कोणकोणत्या आणि किती किंमतीच्या भेटवस्तू देतात, ते पाहुयात...
2 / 9
तब्बल 100.4 अब्ज डॉलरची संपत्ती असलेले मुकेश अंबानी हे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. गेल्या काही वर्षांत अंबानी कुटुंबीयांनी अत्यंत खास क्षणी एकमेकांना महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी यांना देशातील सर्वांत महागडी SUV भेट म्हणून दिली होती.
3 / 9
Rolls-Royce Cullinan Black Badge या एसयूव्हीची किंमत तब्बल 10 कोटी इतकी आहे. नीता अंबानी यांच्या आवडीनुसार आणि कम्फर्टनुसार त्यात काही कस्टमायझेशन करण्यात आले आहेत. त्याची किंमत वेगळी आहे. देशात मोजक्या लोकांकडेच ही गाडी आहे. यात शाहरुख खानचाही समावेश आहे.
4 / 9
2007 मध्ये मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी यांच्या 44 व्या वाढदिवसानिमित्त एअरबस (A319) भेट म्हणून दिली होती. यामध्ये कस्टम मेड ऑफिस, गेम कन्सोल, म्युझिक सिस्टीम, सॅटेलाइट टेलिव्हिजन, वायरलेस कम्युनिकेशन, मास्टर बेडरुम, शॉवरच्या विविध रेंजसह बाथरुम आणि मूड लायटिंहसह स्काय बार अशा सर्व सुविधा या लग्झरी जेटमध्ये होत्या. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या भेटवस्तूसाठी मुकेश अंबानी यांनी तब्बल 240 कोटी रुपये मोजले होते.
5 / 9
2019 मध्ये जेव्हा हिरे व्यापाराची मुलगी श्लोका मेहताने आकाश अंबानीशी लग्न केलं, तेव्हा सासू नीता अंबानी यांनी नवीन सुनेचं कुटुंबात स्वागत करण्यासाठी अत्यंत सुंदर भेट दिली होती. Mouawad L’Incomparable हा 91 डायमंड्सचा नेकलेस श्लोकाला भेट म्हणून देण्यात आला होता. याची किंमत तब्बल 451 कोटी रुपये इतकी असल्याचं समजतंय.
6 / 9
जगातील सर्वांत मौल्यवान नेकलेसपैकी एक नीता अंबानी यांनी सुनेला दिली होती. या नेकलेसमध्ये 407.48 कॅरेटचे पिवळे डायमंड आणि 229.52 कॅरेटचे पांढरे डायमंड आहेत. 18 कॅरेट रोझ गोल्डमध्ये हा डायमंडचा नेकलेस बनविण्यात आला आहे.
7 / 9
जेव्हा अनंत अंबानीने राधिका मर्चंटशी साखरपुडा केला, तेव्हा त्याचा मोठा भाऊ आकाश अंबानीने त्याला 18K Panthere De Cartier ब्रूच भेट म्हणून दिलं होतं. या ब्रूचमध्ये 51 नीलम, दोन पाचू आणि 606 अनकट डायमंड्स जडलेले आहेत. या ब्रूचच्या नाकावर गोमेद हिरा आहे. डीएनएनं दिलेल्या माहितीनुसार, या अनोख्या ब्रोचची किंमत सुमारे 13,218,876 (1 कोटी 32 लाख 18 हजार 876 रुपये) इतकी आहे.
8 / 9
लेक ईशा अंबानीने जेव्हा जुळ्या मुलांना जन्म दिला, तेव्हा आजी-आजोबा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी नातवंडांसाठी अनोखं कपाट भेट म्हणून दिलं होतं. अर्थातच हे कस्टमाइज्ड कपाट होतं, ज्यावर विविध वॉलपेपरचं डिझाइन करण्यात आलं होतं. या कपाटावर सुवर्णाक्षरात मुलांची नावं आणि त्यांच्यासाठी खास संदेश लिहिला होता. या कपाटाची नेमकी किंमत माहीत नसली तरी अँटिलियामधील फर्निटर हे लोरो पियाना, हर्मीस आणि डायर या मोठमोठ्या ब्रँडच्याच असतात.
9 / 9
अनंत अंबानीच्या साखरपुड्याच्या दिवशी बेंटले कॉन्टिनेंटल जीटीसी स्पीड ही बाजारातील अत्यंत नवीन आणि सर्वांत लोकप्रिय गाडी वडील मुकेश अंबानी यांनी भेट दिली होती. या कारची किंमत 4.5 कोटी रुपये इतकी आहे.