Priyanka Chopra Latest Pics: अभिनेत्री प्रियांका (Priyanka Chopra) हिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील स्वतःची खास ओळख तयार केली. एवढंच नाही तर जगातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व म्हणून देखील अभिनेत्रीची ओळख आहे.
प्रियांका सध्या बॉलिवूडपासून दूर आहे, पण चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
प्रियांकाने आता पोस्ट केलेल्या फोटोंध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा ग्लॅमरस ड्रेस घातला आहे. तिच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. सध्या सर्वत्र प्रियांकाच्या फोटोंची चर्चा आहे.
एक चाहता प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट करत म्हणाला, ‘कितनी प्यारी लग रही हो’. प्रियांका नवा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. जगभरातील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
सोशल मीडियावर प्रियांकाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या एका फोटोवर असंख्या चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्स वर्षाव होत असतो. सोशल मीडियावर प्रियांका कायम सक्रिय असते.