Photo : शेवटच्या श्रावण सोमवारीनिमित्त भीमाशंकरला भक्तांचा जमला मेळा

| Updated on: Sep 12, 2023 | 12:04 PM

shravan somvar : श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार ११ सप्टेंबर रोजी आला. यानिमित्ताने भाविकांनी श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे दर्शनासाठी गर्दी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही भीमाशंकरला कुटुंबासह पोहचले.

1 / 5
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे चौथ्या आणि शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त लाखो भाविक आले. देशभरातून दाखल झालेल्या शिवभक्तांची पहाटेपासूनच दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली.

2 / 5
श्रावण सोमवारनिमित्त मंदिराचा गाभारा आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजवण्यात आला आहे. भाविकांकडून होत असलेल्या बम बम भोले, ओम नमो शिवायच्या जयघोषाने मंदिर परिसरही दुमदुमुन गेला आहे.

3 / 5
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब ज्योतिर्लिंग भीमाशंकराच्या दर्शनासाठी आले. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि नेते सचिन अहिर भीमाशंकर मंदिरात आले.

4 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकराची मनोभावे पूजा केली.  राज्यावरील दुष्काळाचे संकट टळू दे, असे साकडे भगवान शंकराला घातले. तसेच माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी घातले.

5 / 5
भीमाशंकर मंदिरात शेवटच्या श्रावण सोमवारी व्हिव्हिआयपीची गर्दी झाली. यामुळे सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी तातकळत उभे राहवे लागले. यामुळे देशभरातील विविध भागांतून दाखल झालेल्या भाविकांमध्ये नाराजी व्यक्त झाली.