Marathi News Photo gallery Pune dehu sant tukaram maharaj Sohala Attractive floral decoration for the occasion
Pune : देहूनगरीत भक्तीमय वातावरण, बीज सोहळ्यानिमित्त फुलांची आकर्षक सजावट, पाहा खास फोटो!
कोरोनानंतर यंदा कोणत्याही निर्बंधाशिवाय देहूत (Dehu) तुकाराम महाराज बीज सोहळा साजरा होत आहे. यंदाचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 374 वा वैकुंठ गमन सोहळा आहे. देवस्थान प्रशासनाकडून यंदा जोरदार तयारी करण्यात आली आहे. वैकुंठ स्थान मंदिर, मुख्य मंदिर आणि जन्मस्थान मंदिर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.