राज्यात दुष्काळाचे सावट, विद्यार्थ्यांनी बनवले शेततळे, किती साठणार पाणी

| Updated on: Sep 03, 2023 | 12:05 PM

Pune News : यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नसल्यामुळे धरणांमध्ये जलसाठा झालेला नाही. यामुळे गावातील लोक पर्याय शोधू लागले आहे. पुणे जिल्ह्यात आता शेततळे निर्माण करण्यास प्राधान्य दिले जात आहे.

1 / 5
पुणे जिल्ह्यातील मावळामध्ये श्रमदानातून शेततळी तयार करण्यात आली आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने दुष्काळ पडण्याची परिस्थिती लक्षात घेऊन शेततळे उभारले जात आहेत. शेततळे उभारण्यासाठी गावकऱ्यांना विद्यार्थ्यांची साथ मिळाली.

2 / 5
मावळ तालुक्यातील सर्व धरण 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु उन्हाळ्यातील परिस्थिती लक्षात घेऊन गावकऱ्यांनी शेततळे उभारण्याचा निर्णय घेतला. यामुळे परिसरातील जमिनीत उन्हाळ्यात पाणी राहणार आहे.

3 / 5
पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी डीवाय पाटील येथील काही विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मिळून मावळात शेलरवाडी या गावात दोन मोठी शेततळी बनवली आहेत. ज्याची पाणी साठवण क्षमता दहा लाख लिटरची आहे.

4 / 5
शेततळे उभारल्यामुळे शेलरवाडी आणि आसपासच्या गावातील पाळीव जनावरे तसेच वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या मदतीबद्दल गावकऱ्यांनी महाविद्यालय आणि ग्रामस्थांचे आभार मानले आहे.

5 / 5
शेततळे असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. परिसरात असणाऱ्या शेतांमधील विहिरींना त्याचा फायदा होता. यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पिकांना पाणी देता येईल. महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतूक केले जात आहे.