Pune Ganpati Visarjan Photo | पुणे गणेशोत्सव विसर्जनाचे असे Photo पाहिले का?
Pune Ganpati Visarjan Photo | पुणे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. पुणे शहरातील विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी देशभरातून भाविकांची गर्दी होते. विदेशातून ही मिरवणूक पाहण्यास अनेक जण येतात.
1 / 6
गेल्या दहा दिवसांपासून घराघरात गणरायाची भक्तीभावाने पूजा होत होती. गुरुवारी अनंत चतुदर्शीला गणरायच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. यासाठी पुणे शहरात देशभरातून भाविक दाखल झाले. पुण्यातील मानाचे पाच गणपती मिरवणुकीत अग्रस्थानी आहे.
2 / 6
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीची ड्रोन दृश्य आहेत. मानाचा पहिला गणपतीसह इतर चार गणपतीची ही मिरवणूक आहे. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यात रस्त्यावर गर्दी झाली आहे. लक्ष्मी रस्त्यावर भाविकाचा जनसागर लोटला आहे.
3 / 6
पुणे येथील कसबा गणपती मानाचा पहिला गणपती आहे. तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ दुसरा तर गुरुजी तालीम गणपती तिसरा मानाचा गणपती आहे. तुळशीबाग गणपती मंडळ चौथ्या क्रमांकावर तर लोकमान्य टिळक यांचा केसरी वाडा गणपती हा पाचवा मानाचा गणपती आहे.
4 / 6
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह सर्वत्र दिसत आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि सौरभ गोखले यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा रथ ओढला. यामुळे भाविकांना गणरायाच्या दर्शनासह सेलिब्रेटही पाहण्यास मिळाले.
5 / 6
तुळशीबाग गणपती मिरवणुकीत मल्लखांबाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. मल्लखांबचा थरार पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटली. पुणे गणेश उत्सव मिरवणुकीत मुलींचाही सहभाग लक्षणीय असतो. त्यांच्याकडूनही ही प्रात्यक्षिके सादर झाली.
6 / 6
पुणे शहराचे आकर्षण असलेल्या दगडूशेठ गणपती मंडळाची मिरवणूक दुपारी चार वाजता सुरु होणार आहे. लक्ष्मी रोडवरुन ही मिरवणूक सुरु होणार आहे. यंदा वेळेत विसर्जन करण्यासाठी अनेक मंडळांनी पुढाकार घेतला आहे.