पुण्यात कुठल्या ग्रामपंचायतीत कुणाच्या “इज्जत का सवाल है?” बघा कुठे कुणाची प्रतिष्ठा पणाला?

| Updated on: Nov 06, 2023 | 9:41 AM

राज्यात काल रविवारी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी एकूण 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये सरासरी ७४ टक्के मतदान पार पडलं. हे मतदान शांततेत पार पडलं. उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप आणि शिवसेनेसोबत गेल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे.

1 / 5
उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप आणि शिवसेनेसोबत गेल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यामधील नेमका कोणता गट या निवडणुकीत भारी पडणार आहे याकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्यात! बघुयात कुठल्या ग्रामपंचायतीत कुणाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे?

2 / 5
जुन्नर तालुका: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. इथं आत्ता ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती.

3 / 5
आंबेगाव तालुका: सहकारमंत्री दिलीप वळसेंच्या निरगुडसर गावातील ग्रामस्थांनी कोणाला कौल दिला, याबाबत राज्याला उत्सुकता लागलेली आहे.

4 / 5
खेड तालुका: अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार दिलीप मोहितेंच्या शेल पिंपळगाव मधील ग्रामस्थांनी पुन्हा त्यांनाच संधी दिली की नाकारली. याबाबत तर्कवितर्क लढवले जातायेत.

5 / 5
शिरूर: शिरूर तालुक्यात शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार अशोक पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे