‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेचं कथानक रंजक वळणावर; लग्नानंतर पहिल्याच दिवशी..
झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. नुकतंच या मालिकेत आकाश आणि वसुचा लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर पहिल्यात दिवशी वसु आकाशबद्दलचं वचन देते.
1 / 5
झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत नुकतंच आकाश आणि वसुचा लग्नसोहळा पार पडला. वसुंधराने बनीसोबत आपल्या सासरी गृहप्रवेश केला. कधी न पाहिलेला असा गृहप्रवेश सगळ्यांनी पाहिला.
2 / 5
लग्नाच्या पहिल्या रात्री आकाश - वसुने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे चिनू-मनू ,बनीसाठी आपण वेगळ्या खोलीत आपल्या मुलांसोबत झोपायचं. हे सगळं होत असताना वसुचं मन तिला खातंय. वसुने आकाशपासून तिच्या पहिल्या नवऱ्याचं सत्य लपवलं आहे.
3 / 5
सासरी पहिल्याच दिवशी वसुला सतत फोनवर पाहून तिला या घरात लक्ष द्यायला सांगते. लवकरात लवकर चिनू-मनूच्या आईची जबाबदारी उचलून आकाशसोबतही आपलं एक प्रेमाचं नातं तयार करून सुखी संसाराचं वचन मागते.
4 / 5
वसुचा लग्नानंतरचा प्रवास आताच सुरू झाला आहे आणि तिच्यावर इतक्या कर्तव्यांची यादी आहे. आता वसु हे नवीन नातं कसं जपणार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आव्हानांना कशी समोरी जाणार, हे मालिकेच्या पुढील भागात पहायला मिळेल.
5 / 5
वसुने आकाशला तिच्या पहिल्या नवऱ्याचं सत्य सांगितल्यावर काय होईल, हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका दररोज रात्री 9.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.