अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल' या ब्लॉकबस्टर चित्रपटात जाली रेड्डीची भूमिका साकारणारा अभिनेता दाली धनंजय याने लग्न केलंय. अभिनेत्याने डॉ. धन्यता गौराक्लारशी लग्नगाठ बांधली आहे.
दाली धनंजय आणि धन्यता गौराक्लारच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. दाक्षिणात्य विवाहपद्धतीनुसार या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला मोजकेच पाहुणे आणि कुटुंबीय उपस्थित होते.
लग्नातील फोटोंमध्ये दाली धनंजय आणि धन्यताचा रोमँटिक अंदाज पहायला मिळाला. धनंजयने पत्नीच्या कपाळावर किस करत प्रेम व्यक्त केलं. तर धन्यतानेही सर्वांसमोर धनंजयला किस करत प्रेम व्यक्त केलं.
लग्नानंतर धनंजय आणि धन्यताने रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या रिसेप्शनला कलाविश्वातील काही सेलिब्रिटी उपस्थित होते. या दोघांवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
दाली धनंजय याने अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा 2' या चित्रपटात जाली रेड्डी ही खलनायकी भूमिका साकारली होती. तो लवकरच 'उत्तरकांड' या कन्नड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.