Pushpa 2 Cast Salary: ‘पुष्पा 2’साठी अल्लू अर्जुनला मिळाले तब्बल इतके कोटी; जाणून घ्या स्टारकास्टची फी..

| Updated on: Dec 11, 2024 | 9:52 AM

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने जगभरात 800 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. तब्बल 400 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटातील कलाकारांनी किती मानधन मिळालं, ते पाहुयात...

1 / 6
पुष्पाराजच्या भूमिकेतून प्रेक्षकांवर विशेष छाप सोडणारा अभिनेता अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी सर्वाधिक फी स्विकारली आहे. त्याला 300 कोटी रुपये मानधन मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

2 / 6
श्रीवल्लीची भूमिका साकारलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचीसुद्धा प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ आहे. तिने या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन स्विकारलं आहे. पुष्पाच्या पहिल्या भागासाठी तिला फक्त 2 कोटी रुपये फी मिळाली होती.

3 / 6
पहिल्या आणि दुसऱ्या भागात खलनायक भंवर सिंहची भूमिका साकारलेला अभिनेता फहाद फासिल याला 8 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. अल्लू अर्जुनसोबत त्याचे ॲक्शन सीन्स चांगलेच गाजले आहेत.

4 / 6
'पुष्पा 2'मध्ये 'किसिक' या गाण्यावर नाचणारी अभिनेत्री श्रीलीला हिला दोन कोटी रुपये मानधन मिळालं आहे. पहिल्या भागात समंथा रुथ प्रभूने 'ऊ अंटावा' या गाण्यासाठी पाच कोटी रुपये मानधन घेतलं होतं.

5 / 6
या चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी सीक्वेलसाठी 15 कोटी रुपये मानधन स्विकारलं आहे. पहिल्या भागाचंही त्यांनीच दिग्दर्शन केलं होतं.

6 / 6
पुष्पा आणि पुष्पा 2 मधील गाणी तुफान हिट ठरली आहेत. देवी श्रीप्रसाद यांनी गाण्यांना दमदार संगीत दिलं आहे. 'पुष्पा 2'साठी त्यांना 5 कोटी रुपये मानधन मिळालं आहे.