या मराठी अभिनेत्याच्या आवाजाच्या बळावर अल्लू अर्जुनने एका दिवसात कमावले 72 कोटी रुपये, कोण आहे तो?. अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 चित्रपट संपूर्ण देशात हिट ठरला आहे. देशातल्या सगळ्या थिएटर्समध्ये हा चित्रपट हाऊसफुल आहे.
पुष्पा 2 च पहिल्या दिवसाच वर्ल्ड वाइड ग्रॉस कलेक्शन जवळपास 200 ते 250 कोटी रुपयाच्या आसपास आहे. याआधी कुठल्याही हिंदी चित्रपटाने एका दिवसात इतकी कमाई केलेली नाही.
चित्रपटात अल्लू अर्जुनची स्टाइल आणि काम खूपच शानदार आहे. हिंदी भाषेतही हा चित्रपट सुपरहिट ठरलाय. अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 ने बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानवरही मात केली आहे.
'पुष्पा 2' च हिंदीमध्ये ओपनिंग कलेक्शन शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमापेक्षा जास्त आहे. 'पुष्पा 2' ने हिंदीमध्ये पहिल्या दिवशी 72 कोटीच्या आसपास कमाई केली आहे.
'पुष्पा 2' च्या हिंदी वर्जनमध्ये अल्लू अर्जुनच्या व्यक्तीरेखेला श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. अलीकडेच श्रेयसने एका मुलाखतीत सांगितलं की, 'तो अजूनपर्यंत मेगा स्टार अल्लू अर्जुनला भेटलेला नाहीय' श्रेयस म्हणाला की, "मी अजूनपर्यंत अल्लू अर्जुनला भेटलेलो नाही. मागच्यावेळी अल्लू अर्जुनने माझ्या कामाच कौतुक केलं होतं"