हरभरा क्षेत्रात वाढ : पोषक वातावरणामुळे हरभरा पीक मोठ्या जोमात बहरलेले आहे. मध्यंतरी निसर्गाच्या लहरीपणामुळे या पिकावरही किडीचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, वातावरण निवळताच शेतकऱ्यांनी फवारणी करुन पाणी दिल्याने आता हे पीकही बहरू लागले आहे. सध्याचे वातावरण हे पीक वाढीसाठी उत्तम आहे. शिवाय शेतकऱ्यांकडे पाणीसाठाही मुबलक प्रमाणात असल्याने चिंता नाही. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्याची ही संधी असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.
नांदेड : नैसर्गिक संकटाची शर्यत पार करीत अखेर रब्बी हंगामातील पिके बहरली आहेत. हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे गहू, हरभरा, ज्वारी ही पिके धोक्यात होती. यंदा वाढीव उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. आता वातारवण पोषक असल्याने उत्पादनात वाढ होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. हंगामी पीक म्हणून कोथिंबरची लागवडही शेतकऱ्यांनी केली असून दर वाढीमुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
शेती मशागतीचे कामे जोमात : मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे शेती कामे करण्याची संधीच शेतकऱ्यांना मिळाली नाही. सध्या वातावरण निवळले आहे. शिवाय सकाळी गारवा आणि दिवसभर ऊन यामुळे रब्बी हंगामातील पिकांची वाढ जोमात होत आहे. मोहरी क्षेत्रामध्ये यंदा प्रथमच वाढ झाली असून या कडधान्यातून उत्पादन पदरी पडेल असा आशावाद आहे.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये यंदा प्रथमच उन्हाळी ज्वारीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
रानभाज्या : रब्बी हंगामात केवळ उत्पादनावरच भर दिला जात नाही तर वातावरणामुळे रानभाज्याचे उत्पादनही घेतले जात आहे. विक्रीसाठी नाही पण किमान घरगुती वापरासाठी म्हणून शेतकरी याची लागवड करतात. मुख्य पिकांबरोबर रानभाज्यानेही शिवार बहरलेले आहे. यंदा पोषक वातावरणामुळे खरिपापेक्षा रब्बी हंगामातच शिवार नंदनवन झाल्याचे चित्र आहे.