Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट, महायुतीमध्ये राड्याची स्थिती, मनसेचा घणाघात ‘औरंगजेबाची औलाद’

| Updated on: May 11, 2024 | 12:58 PM

Sambhajinagar : चौथ्या टप्प्याच्या मतदानाआधी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण तापलं आहे. महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. मनसेला डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे.

1 / 5
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. जोरदार घोषणाबाजी आणि आक्रमक पद्धतीची भाषा सुरु आहे.

2 / 5
समोरासमोर आल्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी परस्पराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे गटाकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न झाला.

3 / 5
संभाजीनगर क्रांती चौकात महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने आलेत. दुपारी 12 वाजता इथून चंद्रकांत खैरे यांची रॅली निघणार होती. त्याआधी महायुतीचे कार्यकर्ते इथे पोहोचले. त्यानंतर गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

4 / 5
"ज्या लोकांनी राम मंदिरावर टीका केली, त्या धर्माध लोकांना घेऊन रॅली काढली जात आहे. जय श्रीराम म्हणण्याची हिम्मत आहे का?" असं मनसेचे जिल्हाध्यक्ष म्हणाले.

5 / 5
"समोरासमोरची लढाई असेल, तर मनसे उत्तर देण्यासाठी सक्षम आहे. ही औरंगजेबाची औलाद आहे. सकाळी यांनी रॅली काढायला सांगितली होती. पण हे मुद्दामून दुपारी आले" असा आरोप मनसे जिल्हाध्यक्षाने केला.