वडिलांमुळे वयाच्या ५० व्या वर्षी देखील अभिनेता अविवाहित; न्यूड फोटोमुळे सर्वत्र खळबळ
वडिलांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयानंतर अभिनेत्याने कधी लग्नाचं स्वप्नच पाहिलं नाही.. वयाच्या ५० व्या वर्षी अभिनेता वडिलांमुळे अविवाहित.. पण त्याच्या न्यूड फोटोमुळे सर्वत्र माजली होती खळबळ...
1 / 5
दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा मोठा मुलगा आणि अभिनेता राहुल खन्ना आता ५० वर्षांचा झाला आहे. तरी देखील अभिनेत्याने लग्न केलेलं नाही. छोटा भाऊ अक्षय खन्ना याच्याप्रमाणे राहुल देखील एकटं आयुष्य जगत आहे.
2 / 5
वडिलांमुळे अक्षय आणि राहुल अविवाहित असल्याची तुफान चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. विनोद खन्ना यांनी पत्नी आणि मुलांचा त्याग करत संन्यास स्वीकारला होता. विनोद खन्ना यांच्या या निर्णयामुळे कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं होतं.
3 / 5
पण वडिलांनी घेतलेल्या निर्णयानंतर अक्षय आणि राहुल यांनी कधीही लग्न केलं नाही. वडिलांनी संन्यास घेतल्यानंतर दोघांचा देखील लग्नावरुन विश्वास उठला आणि दोघांनी सिंगल राहण्याचा निर्णय घेतला.
4 / 5
राहुल याने १९४७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अर्थ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात अभिनेत्यानं साकारलेल्या भूमिकेचं कौतुक झालं पण राहुल बॉलिवूडमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करु शकला नाही.
5 / 5
राहुल झगमगत्या विश्वापासून दूर असला तरी, अभिनेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण एकदा न्यूड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. महत्त्वाचं म्हणजे वयाच्या ५० व्या वर्षी राहुल प्रचंड हँडसम दिसतो.