Raigad Talai Landslide Photo : रायगडमधील तळीये गावात मोठी दुर्घटना, दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू

| Updated on: Jul 23, 2021 | 2:00 PM

दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 32 लोकांचे मृतदेह बाजूला काढले. (Raigad Talai Landslide Maharashtra Photo: 32 Deaths in landslide in Talai village in Raigad)

1 / 5
रायगडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली. महाड तालुक्यातील तळीये  गावात ही भीषण दुर्घटना घडली. या भीषण दुर्घटनेनंतर NDRF कडून बचावकार्य सुरु आहे.

2 / 5
काल सायंकाळी 4 वाजता ही दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडी खाली 35 घरे दबली गेली. त्यामुळे या दुर्घटनेत 32 लोकांचा मृत्यू झाला.

3 / 5
Raigad Talai Landslide Photo : रायगडमधील तळीये गावात मोठी दुर्घटना, दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू

4 / 5
गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. या पावसामुळे महाडच्या तळई गावात 35 गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत.

5 / 5
एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.