रेल्वेचा ऑटोमॅटिक वॉशिंग प्लांट, 10 मिनिटांत धुतला जातो ट्रेनचा संपूर्ण डबा
Express Train | यापूर्वी एक्स्प्रेस गाड्यांची सफाई करायची म्हटलं की बराच वेळ आणि मनुष्यबळ खर्ची पडत होते. मात्र, आता या वॉशिंग प्लांटमुळे वेळ आणि मनुष्यबळ दोन्हीची बचत होईल.
-
-
भोपाळच्या हबीबगंज येथे भारतीय रेल्वेकडून ऑटोमॅटिक रेल्वे कोच वॉशिंग प्लांट तयार करण्यात आला आहे. या वॉशिंग प्लांटमध्ये अवघ्या काही मिनिटांमध्ये संपूर्ण ट्रेन धुतली जाऊ शकते.
-
-
या वॉशिंग प्लांटमध्ये एक्स्प्रेस ट्रेनचा एक डबा धुण्यासाठी साधारण 10 मिनिटं लागतात. यापूर्वी एक्स्प्रेस गाड्यांची सफाई करायची म्हटलं की बराच वेळ आणि मनुष्यबळ खर्ची पडत होते. मात्र, आता या वॉशिंग प्लांटमुळे वेळ आणि मनुष्यबळ दोन्हीची बचत होईल
-
-
रेल्वेचा हा वॉशिंग प्लांट पर्यावरणपूरक आहे. ट्रेन पारंपरिक पद्धतीने धुण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या तुलनेत या वॉशिंग प्लांटमध्ये 90 टक्के पाण्याची बचत होते.
-
-
साधारण वॉशिंग प्लांटमध्ये ट्रेनचा एक डबा धुण्यासाठी 1500 लीटर पाणी लागते. मात्र, ऑटोमॅटिक प्लांटमध्ये 300 लीटर पाण्यात संपूर्ण डबा धुतला जातो. या 300 लीटरपैकी 80 लीटर पाण्याचा पुनर्वापर होतो. याचा अर्थ प्रत्येक डबा धुण्यासाठी 60 लीटर पाणी लागते.
-
-
आगामी काळात रेल्वेकडून देशातील प्रमुख डेपोंमध्ये अशाप्रकारचे वॉशिंग प्लांट उभारण्यात येतील. त्यामुळे रेल्वेच्या वेळ आणि मनुष्यबळात मोठी बचत होईल.