नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा ‘फँड्री’ (Fandry) चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पर्दापण करणारी अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. (Rajeshwari Kharat) आपल्या नजरेनेच चाहत्यांना प्रेमात पाडणारी राजेश्वरी खरात सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
शालू चाहत्यांसाठी अतिशय ग्लॅमरस आणि हाॅट फोटो शेअर करते असते.
शालू चाहत्यांसाठी नवीन-नवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यामध्ये तिची अदा पाहून चाहत्यांच्या काळजाचे पाणी पाणी होत आहे.
शालूचं पात्र साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात चित्रपटामध्ये छोटूशी आणि सोज्वळ दिसणारी शालू आज तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत आहे.
राजेश्वरी मुळची पुण्यातली आहे. मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी तिला ज्यावेळी ‘फँड्री’ चित्रपटाची आॅफर दिली होती त्यावेळी तिने चित्रपट करण्यासाठी नकार दिला होता कारण त्यावेळी दहावीत शिकत होती. नागराज मंजुळेना फँड्री चित्रपटात जो चेहरा पाहिजे होता तो त्यांना राजेश्वरीच्या रूपाने मिळाला. राजेश्वरीने देखील आपल्या उत्तम अभिनयातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, फँड्री शालूचे आताचे रूप पाहिले की चाहत्यांना विश्वासच बसत नाही.
शालूनं अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी जागा बनवली मात्र आता तिचे हे लूक्स चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.