Marathi News Photo gallery Rajinikanth ramcharan suriya mahesh babu yash attends Anant Ambani Radhika Merchant wedding traditional attire wins netizens heart
संस्कृती यांनीच जपली..; अंबानींच्या लग्नात दाक्षिणात्य कलाकारांनी जिंकली मनं
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यासाठी बॉलिवूड कलाकारांनी लाखो रुपये खर्च करून ड्रेसेस डिझाइन केले होते. मात्र या सगळ्यात दाक्षिणात्य कलाकारांचा साधेपणा नेटकऱ्यांना खूप आवडला. यांनीच संस्कृती जपती.. असे कमेंट्स नेटकऱ्यांनी दिले आहेत.
1 / 11
'वेडिंग ऑफ द इयर' म्हणून संबोधल्या गेलेल्या अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला देश विदेशातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
2 / 11
अमिताभ आणि जया बच्चन यांचे आशीर्वाद घेणारा शाहरुख खान, रजनीकांत, अनील कपूर आणि रणवीर सिंहचा भन्नाट डान्स, अशी अनेक दृश्ये या सोहळ्यात पहायला मिळाली.
3 / 11
भव्य प्री-वेडिंगच्या जल्लोषानंतर मुकेश आणि नीता अंबानी यांचे चिरंजीव अनंत आणि मोठे व्यावसायिक वीरेन आणि शैला मर्चंट यांची कन्या राधिका यांनी शुक्रवारी मुंबईत लग्नगाठ बांधली.
4 / 11
वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) जिओ वर्ल्ड ड्राइव्ह इथं पार पडलेल्या या सोहळ्याला चित्रपट, राजकीय, क्रीडा तसंच इतर क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पहायला मिळाली. सोशल मीडियावरही या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले.
5 / 11
एकीकडे बॉलिवूड सेलिब्रिटी अत्यंत ग्लॅमरस अंदाजात या लग्नसोहळ्यात झळकले. तर दुसरीकडे दाक्षिणात्य कलाकारांनी आपली परंपरा जपत नेटकऱ्यांची मनं जिंकली.
6 / 11
रजनीकांत, रामचरण, राणा डग्गुबती, व्यंकटेश, महेश बाबू, सूर्या आणि त्याची पत्नी ज्योतिका अशा विविध साऊथ सुपरस्टार्सनी अंबानींच्या कार्यक्रमाला लक्षवेधी पोशाखात हजेरी लावली.
7 / 11
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याचा उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या.
8 / 11
संस्कृती यांनीच जपली.. असं म्हणत नेटकऱ्यांनी दाक्षिणात्य कलाकारांचं कौतुक केलं. रजनीकांत, सूर्या यांसारख्या कलाकारांनी दाक्षिणात्य संस्कृतीचं प्रतीक असलेला मुंडू परिधान केला होता.
9 / 11
लाखो रुपये खर्च करून बॉलिवूडच्या विविध कलाकारांनी या लग्नसोहळ्यासाठी खास ड्रेसेस डिझाइन केले होते. मात्र त्यातही दाक्षिणात्य कलाकारांचा साधेपणा फार आवडल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
10 / 11
दाक्षिणात्य अभिनेता आणि निर्माता पृथ्वीराज सुकुमार त्याच्या पत्नीसह या लग्नसोहळ्याला पोहोचला होता.
11 / 11
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते व्यंकटेश या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. तेलुगू सिनेसृष्टीत त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.