Ramzan | रमजान काळात पूर्ण श्रद्धेने रोजे ठेवणारी ‘ही’ हिंदू महिला कोण?
Ramzan | एका बिगर मुस्लिम माणसाने 30 दिवस उपवास ठेवण्यासाठी दृढ संकल्पाची आवश्यकता लागते. सुरुवातीला तुम्हाला चक्कर येऊ शकते. पण हळूहळू त्यात सुधारणा होते असं नीलम म्हणाली.
1 / 5
सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. या महिन्यात अनेक मुस्लिम बांधव रोजे ठेवतात. एक हिंदू महिला सुद्धा पूर्णपणे श्रद्धेने रमजानमध्ये रोजा ठेवते. जगभरातील मुस्लिम रोजा ठेवतायत. आम्ही आज अशा हिंदू महिलेबद्दल सांगणार आहोत, जी काटेकोरपणे निष्ठेने रोजा पाळते.
2 / 5
ही हिंदू महिला भारतातील नाहीय. ती मॉरिशेसमध्ये राहते. नीलम गोकुलसिंग तीच नाव आहे. मित्र, मैत्रिणींसोबत एकजुटता दाखवण्यासाठी तिने रमजानच्या काळात रोजे ठेवण्यास सुरुवात केली. आता ती अध्यात्मिक बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतेय.
3 / 5
2021 मध्ये मलेशियात असताना रमजान काळात तिने रोजे ठेवण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिथे ती एक विद्यार्थीनी होती. पुढे तिने तिथेच काम सुरु केलं. खलीज टाइम्सला नीलमने ही माहिती दिली.
4 / 5
मलेशियामध्ये नीलमचे बरेच मुस्लिम मित्र-मैत्रिणी होत्या. ती सहरी आणि इफ्तार करायची. हे सर्व एकजुटता आणि मुस्लिम संस्कृती समजून घेण्यासाठी तिने सुरु केलं.
5 / 5
26 वर्षीय नीलम फिनटेक कंपनीत नोकरी करते. दोन वर्षांपूर्वी ती नवरा अक्षय रामूगुरुसोबत दुबईला शिफ्ट झाली. पण अजूनही रमजानच्या काळात ती उपवास करते. रोजे ठेवते.