राष्ट्रपतींच्या भेटीसाठी रायगडावर लाल कार्पेट, रोषणाई, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chh. Shivaji Maharaj) समाधीला अभिवादन करण्यासाठी दुर्गराज रायगडवर (Raigad) आज येत आहेत.
1 / 6
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chh. Shivaji Maharaj) समाधीला अभिवादन करण्यासाठी दुर्गराज रायगडवर (Raigad) आज येत आहेत. राष्ट्रपती रामानथ कोविंद चार दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
2 / 6
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं रायगड किल्ल्यावर जय्यत तयारी केली आहे. यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहोत
3 / 6
राज सदरेवरील शिवाजी महाराजांचा महाराजांचा पुतळा, होळीच्या माळावरील महाराजांचा पुतळा. समाधी जवळील श्रीजगदीश्वर मंदीर परीसर राष्ट्रपती महोदयांसाठी सर्व रायगड लाल कार्पेट, फुलं, रोषणाईने सज्ज करण्यात आला आहे.
4 / 6
राष्ट्रपतींकरीता प्रशासनाने रायगड किल्ला सुदंर सजवलेला असल्याने असेच चित्र सामान्य शिवप्रेमींसाठी असावं, अशी इच्छा व्यक्त करण्यात येत आहे.
5 / 6
रायगडावर कुणी तरी अस्थी ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा वाद झाला
6 / 6
राष्ट्रपती रामानथ कोविंद 6 ते 9 डिसेंबर या चार दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज रायगडला ते भेट देतील. लोहगाव पुणे येथील एअर फोर्स स्टेशनला 7 डिसेंबरला भेट देतील. तर, 8 डिसेंबरला मुंबईत मिसाईल वेसेल स्काड्रन कार्यक्रमाला उपस्थित राहतील.