सोशल मीडियावर राहा कपूरचीच चर्चा; रणबीर-आलियाने पहिल्यांदाच दाखवला चेहरा
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आलिया भट्टने मुलीला जन्म दिला होता. आता वर्षभरानंतर अखेर रणबीर आणि आलियाने त्यांची मुलगी राहाचा चेहरा सर्वांना दाखवला आहे. ख्रिसमसनिमित्त रणबीर-आलियाने त्यांच्या चाहत्यांना गोड सरप्राइज दिला आहे. राहाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
1 / 6
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टने ख्रिसमसनिमित्त अखेर लेकीचा चेहरा सर्वांना दाखवला आहे. राहा कपूरला त्यांनी पापाराझींसमोर आणलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर राहाचीच जोरदार चर्चा आहे.
2 / 6
ख्रिसमसनिमित्त संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र येतं. त्यामुळे रणबीर आणि आलियासाठी हा दिवस खूपच खास आहे. कपूर कुटुंबीयांच्या लंचला जाण्यापूर्वी रणबीर-आलियाने राहाला पापाराझींसमोर आणलं.
3 / 6
राहाने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला होता. तिचा हा क्यूट अंदाज नेटकऱ्यांचा खूप भावला. राहा ही तिचे आजोबा आणि रणबीरचे वडील ऋषी कपूर यांच्यासारखीच दिसते, असे कमेंट्स अनेकजण करत आहेत.
4 / 6
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जूनमध्ये आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2022 रोजी तिने मुलगी राहा कपूरला जन्म दिला.
5 / 6
रणबीर आणि आलियाने आतापर्यंत राहाचा फोटो कुठेच पोस्ट केला नव्हता. इतकंच नव्हे तर त्यांनी पापाराझींनाही तिचे फोटो क्लिक न करण्याची विनंती केली होती. आता वर्षभरानंतर त्यांनी राहाला सर्वांसमोर आणलं आहे.
6 / 6
ख्रिसमसनिमित्त रणबीर आणि आलियाने चाहत्यांना अत्यंत गोड सरप्राइज दिला आहे. राहाच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा होत आहे. ऋषी कपूर, राज कपूर यांच्यासारखेच तिचे डोळे असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.