Veer Savarkar Film | ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटासाठी सरकारने पैसा दिला का? रणदीप हुड्डाने दिलं असं उत्तर

| Updated on: Mar 06, 2024 | 1:51 PM

Veer Savarkar Film | 'स्वातंत्र्य वीर सावरकर' यांच्या जीवनावर बनवण्यात आलेला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. लोकसभा निवडणुकीआधी 22 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. त्याआधी या चित्रपटावरुन चर्चा सुरु झाली आहे. स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या मुद्यावरुन भारतीय राजकारणात दोन गट आहेत.

1 / 5
रणदीप हुड्डा याने भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर ऊर्फ वीर सावरकर यांच्या जीवनावर चित्रपट बनवला आहे. लवकरच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. रणदीप हुड्डाने या चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारली आहे.

2 / 5
एक पक्ष सावरकरांना वीर सावरकर बोलतो, दुसरा त्यांना माफी वीर बोलतो, त्यावर रणदीप हुड्डाला एका मुलाखतीत प्रश्न विचारला. तो लगेच म्हणाला की,  'सावरकर माफी वीर नव्हते, ते  वीर होते. हिंदुत्वाचे पिता आहेत'

3 / 5
कश्मीर फाइल्स, द केरल फाइल्स, आर्टिकल 370, त्यानंतर वॅक्सीन वॉर यांना प्रोपगेंडा म्हणजे सरकारचा प्रचार करणारे चित्रपट ठरवण्यात आलं. असे चित्रपट बनवण्यासाठी सरकार पैसे देते का? या प्रश्नावर रणदीप हुड्डाने उत्तर दिलं.

4 / 5
"नाही, मी तर माझाच पैसा लावला आहे. मागच्या दोन वर्षांपासून मी हा चित्रपट बनवतोय. मी अडचणींचा सामना केलाय. दोन वर्षांसाठी काळ्या पाण्याची शिक्षा मलाच झाली होती, असं वाटलं. खूप अडचणींवर मात करुन हा चित्रपट बनवलाय. तुम्ही याला प्रोपगेंडा चित्रपट ठरवत असाल, तर तस म्हणा. माझी काही हरकत नाही"

5 / 5
"मी पैसा यासाठी लावला, कारण पहिल्यापासून मी या चित्रपटाशी जोडलेलो आहे. मी माझ्या कलेला, मला जे सांगायचय त्याला पाठिंबा दिला नाही, तर दुसऱ्यांच्या सपोर्टची अपेक्षा कशी करु शकतो. मी जे बोलतो, त्यावर पैसे लावतो" असं रणदीप हुड्डा म्हणाला.