Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 23 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करत काम करत राहा. निश्चितच फळ मिळेल. इतर आपल्या बाबतीत काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला सक्षम करत पुढे पाऊल टाका. शुभ अंक 31 आणि शुभ रंग हिरवा राहील.
3 / 10
काही नवीन निर्णय घेऊ शकता. कारण भविष्याच्या दृष्टीकोनातून पावलं उचलणं गरजेचं आहे. कौटुंबिक पातळीवर चांगली मदत होईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग केसरी राहील.
4 / 10
कधी जवळच्या व्यक्तींकडून दगाफटका होण्याची शक्यता असते. त्यामुळे ताक फुंकून पिणं गरजेचं आहे. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 15 आणि शुभ रंग नारंगी राहील.
5 / 10
नवी संधी चालून येईल. या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टी तुम्ही ठरवल्याप्रमाणे होतील. त्यामुळे आनंदी राहाल. शुभ अंक 17 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
6 / 10
काही कारणास्तव कौटुंबिक वादाला सामोरं जावं लागू शकतं. कोणतीही गोष्ट करताना दहा वेळा विचार करा. उगाचच वाद होईल असं वागू नका. शुभ अंक 19 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
आपल्याकडे पैसा असला की काही काम करावीशी वाटतात. पण खरंच ती करणं गरजेचं आहे का याचा विचार करा. विनाकारण पैसा खर्च करू नका. शुभ रंग 26 आणि शुभ रंग जांभळा राहील.
8 / 10
आपल्या कामानेच समोरच्याला उत्तर द्यायचं असतं लक्षात ठेवा. वायफळ बडबड करून काहीच उपयोग होत नाही. आत्मविश्वासाने कामं करण्याचा प्रयत्न करा. शुभ रंग 23 आणि शुभ रंग लाल राहील.
9 / 10
कामातून वेळ काढून घरच्यांना वेळ द्या. कारण कौटुंबिक आनंदात सहभागी व्हा. कारण दु:खात सर्वाधिक मदत ही जवळच्या व्यक्तींकडूनच होते. शुभ अंक 11 आणि शुभ रंग निळा राहील.
10 / 10
हातात असलेला पैसा वेगाने खर्च होत असल्याने टेन्शन येईल. पण पैसा योग्य कामासाठीच खर्च होत आहे लक्षात ठेवा. त्यामुळे संयम ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग पांढरा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)