Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 17 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला वेगळीच उर्जा मिळेल. अध्यात्मिक आणि धार्मिक प्रगती या काळात होईल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.
3 / 10
आपल्या कामावर लक्ष केंद्रीत ठेवा. मोठी जोखिम पत्कारू नका. अन्यथा फटका बसू शकतो. उत्पन्न आणि खर्चाचा तालमेल न बसल्याने फटका बसेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.
4 / 10
कुटुंबासोबत वेळ व्यतित केल्याने मानसिक समाधान मिळेल. घरातील काही वाद दूर ठेवा आणि कामावर लक्ष ठेवा. घराची डागडुजी काही कारणास्तव हाती घ्यावी लागेल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
5 / 10
ज्यांनी आपल्याला आयुष्यभर साथ दिली त्या लोकांचे आभार आज माना. त्यांना काही गरज असेल तर ती भागवा. यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळतील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
सत्य हे कायम कटू असतं. त्यामुळे काही जण तुमच्याकडे पाठ फिरवतील. पण सत्य कटू असलं तरी ते शाश्वत असतं. त्यामुळे काम करत राहा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
7 / 10
कामानिमित्त प्रवासाचा योग जुळून येईल. काही कामं पटकन झाल्याने दिलासा मिळेल. भावकीच्या वादामुळे डोक्याला ताप होईल. न्यायालयाची पायरी चढावी लागू शकते. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
कोणतंही काम पूर्णत्वास नेण्यासाठी योजना आखावी लागते. योजनाबद्ध पद्धतीने काम केलं तर यश नक्कीच मिळते. आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.
9 / 10
ठरलेल्या योजना अचानक रद्द कराव्या लागू शकतात. काही कामांसाठी अतिरिक्त पैसा खर्च करावा लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.
10 / 10
आज एखाद्या कामाची जोखिम पत्कारू शकतात. काही दिवसात तुम्हाला त्याचा चांगला निकाल दिसून येईल. मेहनतीशिवाय पर्याय नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)