Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 23 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
भागीदारीच्या व्यवसायात सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. संभ्रम दूर करण्यासाठी मनमोकळेपणाने बोला. आज कुटुंबातील सदस्यांकडून आनंद मिळेल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.
3 / 10
आज तुम्हाला उत्साही वाटेल. तुम्हाला काही चांगल्या संधी चालून येतील. कोणताही नवीन करार करण्यापूर्वी काळजी घ्या. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. घरामध्ये काही कारणामुळे वाद होईल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा असेल.
4 / 10
आज तुमच्या वैयक्तिक कामावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या करिअरमध्ये काही उलथापालथी होऊ शकतात. मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी लेखी लिहून घ्या. काही कारणास्तव वरिष्ठांचा ओरडा घावा लागेल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
5 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. तुमची वागणूक बदला. अन्यथा फटका बसू शकतो. आज आरोग्याची तक्रार डोकं वर काढेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
आज तुमच्या घरी नातेवाईक अचानक येतील. त्यांचा चांगला पाहुणचार करा. इतरांच्या गुळगुळीत चर्चा करणं टाळा. नवीन व्यवसायात गुंतवणूक करू शकता. खाण्यापिण्याची काळजी घ्या. तुमचे वैयक्तिक आयुष्य चांगले राहील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
7 / 10
आईच्या तब्येतीची काळजी घ्या. काही वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. पत्नीसोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतो. आर्थिक गुंतवणूक विचार करून करा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
आजचा दिवस खूप चांगला जाईल. तुमची अडकलेली कामं या काळात पूर्ण होतील. इतर मार्गातून पैशांची आवक होईल. त्यामुळे कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. शत्रूपक्षावर विजय मिळवाल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.
9 / 10
आज तुमच्या वाणीचा प्रभाव इतरांवर पडेल. काही किचकट कामं पूर्ण कराल. त्यामुळे डोक्यावरील ताण कमी होईल. जवळच्या ठिकाणी फिरण्याचा योग जुळून येईल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.
10 / 10
आजचा दिवस सामान्य राहील. काही कामं होतील काही कामं रखडतील. पण जास्त ताण घेऊ नका. जसं काम होईल तसं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रिय व्यक्तीच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)