PHOTO : रश्मीला इन्स्टाग्रामवर तब्बल 40 लाख फॉलोअर्स, सेलिब्रेशन तर हवंच!
अभिनेत्री रश्मी देसाईने इन्स्टाग्रामवर 40 मिलियन म्हणजेच 40 लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे (Rashmi Desai celebration).
रश्मी लवकरच एका म्यूजिक व्हिडीओत दिसणार आहे. याबाबतची माहिती संगीतकार पलाश मुच्छल यांनी दिली आहे. या व्हिडीओत रश्मीसोबत अभिनेता शाहीर शेख देखील दिसणार आहे.
Follow us on
अभिनेत्री रश्मी देसाईने इन्स्टाग्रामवर 40 मिलियन म्हणजेच 40 लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. सोशल मीडियावर इतक्या मोठ्या संख्येत फॉलोअर्सने पाठिंबा दिल्याने रश्मी प्रचंड खूश झाली आहे. याच आनंदाला तिने सेलिब्रेट केलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रश्मीने जम्पसूट परिधान केलेला दिसत आहे.
रश्मीच्या फोटोमागे 4 मिलियन लिहिलं आहे. रंगेबिरंगी फुग्यांनी अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. याशिवाय रश्मीच्या समोर असलेल्या टेबलवर केक ठेवण्यात आला आहे.
इन्स्टाग्रामवर 40 लाख फॉलोअर्स झाल्याबद्दल रश्मीने सर्वांचे आभार मानले आहेत. “आपल्या सर्वांची आभारी आहे. आपल्या सर्वांमुळेच हे शक्य झालं”, असं ती म्हणाली आहे.
रश्मीने बिगबॉस सिझन 13 मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात तिची सिद्धार्थ शुक्लासोबतच्या मैत्री आणि भांडणाची चांगलीच चर्चा रंगली होती.
रश्मी लवकरच एका म्यूजिक व्हिडीओत दिसणार आहे. याबाबतची माहिती संगीतकार पलाश मुच्छल यांनी दिली आहे. या व्हिडीओत रश्मीसोबत अभिनेता शाहीर शेख देखील दिसणार आहे.